कला आणि क्रीडा ही क्षेत्रे जीवनाच्या उंबरठ्यावर उभ्या असणा-या युवक युवतीच्या दृष्टीने फार महत्वाची आहेत. जीवनाचा आस्वाद घेण्यासाठी, जीवनाचे सौंदर्य खुलवण्यासाठी, जीवनातील विविध प्रकारच्या संघर्षांना सामोरे जाऊन तोंड देण्यासाठी, जीवनातील यशापयश खिलाडू वृतीने स्वीकारण्यासाठी, प्रतिस्पर्धी खेळाडूच्या कौश्याल्याला मनापासून दाद देण्यासाठी, इतरांचे कला क्रीडा क्षेत्रातील प्राविण्य खुल्या दिलाने मान्य करण्यासाठी आणि या सर्वातून आपले व्यक्तिमत्व संपन्न, समृद्ध आणि चतुरस्त्र करण्यासाठी कला आणि क्रीडा यांच्या विकासाची नितांत गरज आहे. शरीर आणि मन संस्कारक्षम राहते त्या वयातच या क्षेत्रात पदार्पण करण्याची, आपले नैपुण्य सिध्द करण्याची संधी युवक युवतीना मिळवून देणे आवश्यक असते.